03 December 2014

मराठी / English कविता / Rhymes : डाउनलोड करा.

यात नवीन-जुन्या पाठ्यपुस्तकातील कविता / Rhymes आहेत, आपणास आवश्यक ती फाईल डाउनलोड करा.

  1st std rhymes ( audio) 
    DOWNLOAD
  2nd std rhymes (audio)    
    DOWNLOAD
  3rd std rhymes ( audio) 
    DOWNLOAD
  4th std rhyme (audio) 
    DOWNLOAD
  5th std rhymes (audio) 
    DOWNLOAD
  6th std rhymes ( audio)
    DOWNLOAD
  7th std rhymes ( audio)
 वर्ग था-मराठी-कविता-mp3-
    DOWNLOAD 
लवकरच ईतर मराठी / English कविता / Rhymes डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

27 November 2014

शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”

“आनंदवन” विषयी थोडं......!!!
पुस्तकाचे नाव : शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”          लेखक: फारूक एस. काझी.    प्रस्तावना:   भाऊसाहेब चासकर.      प्रकाशक :एकनाथ गुरव. “अंकुर” गट.सांगोला.जिल्हा:सोलापूर.      किंमत:१२०/- रु.                     पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध  आहे.         संपर्क : 8275459276 ( फारूक काझी )    किंवा     माझ्याशी  संपर्क साधा  :  9623344643  ( प्रशांत क-हाडे )
 आनंदवन ही कथा आहे एका जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या तरुण व काहीतरी करू पाहणाऱ्या धडपड्या शिक्षकाची...यात नाट्य नाही. पण अनुभव जरूर आहेत.एकट्याने एखादे काम करताना येणाऱ्या अडचणी काय असतात तसेच मोडून पडण्याचे क्षण कसे असतात हे यात अनुभवायला मिळेल. तसेच मार्ग शोधताना होणारी घुसमट,त्रास अन त्याचसोबत मित्रांची साथ हे सर्व ही अनुभवायला मिळेल.असं एकटं असताना मनात नकारात्मकता भरणं साहजिक आहे. कारण ती स्वाभाविक मानसिकता आहे. पण हीच नकारात्मकता माणसाला काम व आवड या दोन्हीपासून दूर नेते.आनंदवनमध्ये सकारात्मक विचार आपली सर्जन व सृजनशीलता कशी फुलवते याचा अनुभव घ्याल.
सरकारी शाळातून चालणारे प्रयत्न लोकापर्यंत पोचत नाहीत.कारण आपण जे करतोय किंवा करून पाहिलंय हे तितकसं महत्त्वाचं नाहीय असंच वाटत राहतं. आनंदवन अशाच प्रयत्नांची कहाणी आहे. यात सोपे सोपे प्रयोग आहेत त्यासोबतच प्रेरणाही आहे. यात असलेला शिक्षक मंजे दुसरं तिसरं कुणी नसून आपणच आहोत, असाच अनुभव येईल.सरकारी शाळांनी समाजातील अनेक पिढ्यांना घडवलंय.मात्र आता अचानक या शाळाविषयी इतका अविश्वास का निर्माण झाला? याचं उत्तर आपण सर्वांनी शोधून काढायचंय. आनंदवन सरकारी शाळेचं व व्यवस्थेच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आलेल्या शिक्षकाच्या घुसमटीचीही कहाणी आहे. काही तरी करून दाखवण्याची धमक सर्वांत आहे. पण परिस्थिती अनुकूल नसते.चुकून शाबासकीही वाट्याला येत नाही.तरी कुणाला दोष न देता आपली अंत:प्रेरणा कायम ठेऊन काम करत राहणाऱ्या व आपल्या सोबत सर्वांना नेऊ पाहणाऱ्या एका शिक्षकाची ही कथा.
सरकारी शाळांचं अस्तित्व कायम राहणार आहे.यात वाद नाही.पण त्यासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा आहे.त्याशिवाय सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा समाजाच्या विकासात आपला वाटा उचलू शकणार नाहीत. अमेरिकेचं येता जाता अनुकरण करणारे आपण हे विसरतो की तिथं सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं.आपल्याकडील चित्र उलट आहे.आपल्याकडे सरकारी शाळा ह्या हलक्या समजल्या जातात.एकदा या शाळांवर विश्वास ठेऊन पाहूया. त्या केवळ गरीबांच्या नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तराला सामाऊन घेणाऱ्या समाजाच्या “आई” आहेत.ही त्या आईची कहाणी आहे.“मराठी शाळा कशी आपल्या जीवनविश्वाचा भाग असते हे चित्र इथे पाहायला मिळते.” इथे स्वप्नं आहेत.धड-पडणं आहे.
भाऊसाहेब चासकर या धडपड्या शिलेदार शिक्षकाची प्रस्तावना,एकनाथ गुरव या हरहुन्नरी शिक्षकाचं प्रकाशकपण, तसेच . 2 रीच्या पाठ्यपुस्तकात ज्यांचा “मला वाटते” हा पाठ समाविष्ट आहे त्या फारूक काझी या शिक्षकाचं अनुभव कथन हे या पुस्तकाचं आणखी एक विशेष.


पुस्तकाचे नाव :शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”          लेखक: फारूक एस. काझी.       प्रस्तावना: भाऊसाहेब चासकर.      प्रकाशक :एकनाथ गुरव.“अंकुर” गट.सांगोला,जिल्हा:सोलापूर.      किंमत:१२०/- रु.                     पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध  आहे.         संपर्क : 8275459276 ( फारूक काझी )    किंवा     माझ्याशी  संपर्क साधा  :  9623344643  ( प्रशांत क-हाडे )

23 November 2014

महाराष्ट्र शासनाचे E-Locker

महाराष्ट्र शासनाने Maha E - Locker नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
या सुविधेमार्फत आपल्याला महत्वाची कागदपत्रे घेवून फिरण्याची गरज नाही. सर्व कागदपत्रे आपण ऑनलाईन सुरक्षित ठेवू शकता. या Locker मध्ये आपण कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे, Birth  Certificate , Cast  Certificate  , Residential , Medical , Educational  Records  इत्यादी. आपल्याला पाहिजे ती कागदपत्रे आपण Upload  करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft  copy  आपल्या Locker  मध्ये upload  केली जाईल.

यासाठी आपला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

elocker.maharashtra.gov.in  या लिंक वर गेल्यानंतर आपला आधार नंबर द्या. तुमच्या Registered  mobile  Number  वरती एक password  (OTP) येईल तो password  टाकून account  validate  करा.

तुमचा E -Locker  तयार.

हवी ती कागदपत्रे upload  करा.

ज्यावेळी हवी असतील त्यावेळी आपला आधार Number  टाका, mobile  Number  वर password  येईल तो टाका. हवी ती कागदपत्रे download  करा.

25 September 2014

शालेय पोषन आहार व ईतर प्रपत्र (ms excel files )

शालेय पोषन आहार दैनिक गणना                डाउनलोड
शालेय पोषन आहार संपूर्ण प्रपत्र                  डाउनलोड
शाळा स्वयंमुल्यमापन प्रपत्र                     डाउनलोड 
कायद्याची पुस्तके                           डाउनलोड

11 August 2014

संगणक- इंटरनेट शिका आणि प्रमाणपत्र मिळवा अगदी मोफत.........!

मागील लेखात "संगणक-इंटरनेट साक्षरता कार्यक्रमाची" ओळख झाली.
   या लेखात "कंप्यूटर सिखो डाॅट काॅम" ची ओळख करूण घेवुया. computerseekho.com हे संकेतस्थळ हिंदी भाषेत संगणक शिकविते.संगणक शिकणे झाल्यानंतर याच वेबसाईटवरून ' प्रमाणपत्र' सुद्धा मिळविता येते.

चला मी अधिक सांगण्यापेक्षा तुम्हीच http://computerseekho.com/home.html
 या वेबसाईट ला भेट द्या,आणि कोणाचीही मदत न घेता संगणक शिका अगदी मोफत.

10 August 2014

ईयत्ता 1 ते 8 ची पाठ्यपुस्तके (ebook-pdf) डाउनलोड करा.

वर्ग 1 ते 8 ची सर्व विषयाची व सर्व माध्यमाची  पाठायपुस्तके (ईबुक - pdf) डाउनलोड करा.

पाठ्यपुस्तके डाउनलोड करण्यासाठी या http://www.balbharati.in/index1.htm लिंक वर क्लिक करा.  ( जो वेबपेज ओपन होईल त्यात डाव्या बाजुला वरच्या कोपर्यात 'text book library' वर क्लिक करा.)

08 August 2014

छोट्या-छोट्या कागदी पिशव्या (बॅग्ज) तयार करा.

सोबतच्या चित्रात दिसणार्या पिशव्या तयार करण्याची कृती (सचीत्र) समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा

07 August 2014

संगणक - इंटरनेट साक्षरता कार्यक्रम

        गुगलने महीलांना संगणक व इंटरनेट साक्षर करण्यासाठी "helping women get online" ही मोहीम ऑनलाईन सुरू केली आहे. (महीलांसाठी असलेल्या मोहीमेचा लाभ पुरूष सुद्धा घेवू शकतात.) यात  इटंरनेट व संगणक वापरण्यासाठी टप्प्या-टप्प्याने (सचीत्र) खालील बाबीविषयी मार्गदर्शन  केले आहे.

 मोबाइलवर  इंटरनेट कसे वापरावे ?



आपल्या फोनवर WI-FI कसे वापरावे ?
आपल्या फोनवर इंटरनेट कसे वापरावे ?
आपल्या फोनवर भाषा सेट करणे.
संदेश कसे पाठवावे ?
डेटा वापर आणि किंमत.
Youtube वर व्हिडिओ कसे पाहावे आणि शेअर करावे ?
माहिती ऑनलाईन कशी शोधावी ?
ईमेल पत्ता कसा तयार करावा ?
आपल्या फोनवर कसे चॅट करावे ?

संगणकाचे मूलभूत कौशल्य


इंटरनेट ब्राऊजर कसे वापरावे आपला संगणक सुरू आणि बंद करणे ?
आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा रंग आणि प्रखरता समायोजित करणे
आपल्या संगणकाच्या ध्वनी समायोजित करणे
इंटरनेटवर लोकांशी बोलण्यासाठी मायक्रोफोनचा वापर
वेबकॅमचा वापर करून व्यक्तीला ऑनलाइन पाहणे
आपल्या संगणकाच्या घड्याळाची वेळ बदलणे
एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल हलविणे
आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा मुखवटा बदलणे
मजकूर कॉपी आणि पेस्ट करणे

इंटरनेट कौशल्ये


इंटरनेट ब्राऊझरसह इंटरनेट वापरणे सुरू करा
माहिती ऑनलाइन शोधणे
बहुविध साइट एकाचवेळी वापरणे
ऑनलाइन नकाशे वापरून दिशा शोधणे
व्यवसाय फोन क्रमांक शोधणे
रेस्टॉरंट ऑनलाइन शोधणे
पाककृती ऑनलाइन शोधणे
वाचण्यास सोपे जाण्यासाठी शब्द लहान किंवा मोठे करणे
इंटरनेटवरून फाईल आपल्या संगणकावर जतन करणे
साईटचा दुवा नंतर पाहण्यासाठी जतन करणे
इंटरनेटवर संकेतशब्द तयार करणे
आपण ऑनलाइन पाहिलेली पहिली वेबसाईट सेट करणे


चॅट आणि ईमेल


इमेल खाते तयार करणे
इमेल पाठविणे आणि स्विकारणे
तत्काळ ऑनलाइन चॅटिंग करणे
इंटरनेटवर व्हिडीओमधून बोलणे
इमेलमधून फाईल पाठविणे
आपल्या फोनवर इमेल तपासणे
हानीकारक इमेल पासून सावधान



'भाषा सेटिंग्ज' 


आपल्या भाषेमध्ये माहिती शोधणे
आपल्या भाषेमध्ये इमेल पाठविणे
भाषांतरासाठी इंटरनेटचा वापर करणे
वरील सर्व बाबी विषयी टप्प्या-टप्प्याने (सचीत्र )  मार्गदर्शन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

06 August 2014

School Mapping Application डाउनलोड करा ( Latest version-School 2 )



अ) school mapping application ( latest version : school2)  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ब) school mapping application कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणारी माहीतीपुस्तिका ( user mannual )  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

क ) आपल्या  शाळेचे SCHOOL MAPPING REPORT पाहण्यासाठी येथे क्लिक करा . 


04 August 2014

शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .

खालील प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करून आपल्या शाळेचे कामकाज  पेपरलेस करा . 

1) शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file ) डाउनलोड करा .
2) स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईड, निर्गम . जनरल रजिस्टर. ( ms excel file )  डाउनलोड करा .  
3) माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . ( ms excel file )  डाउनलोड करा . 
4) सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र ( ms excel file )  डाउनलोड करा . 
5) युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड करा . 
6) QMT प्रपत्र ( ms excel file )  डाउनलोड करा . 
7) दैनिक टाचण ( ms excel file ) डाउनलोड करा . 
8) कुटुंब पंजिका ( ms excel file ) डाउनलोड करा . 
     
 वरील सर्व फाइल्सची  निर्मिती  "श्री हरके महेश शरणप्पा " (सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे. 
      श्री.  हरके सरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या सर्व फाइल्स "शिक्षक मित्र" च्या वाचकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता उपलब्ध दिल्यात, याबद्दल  सर्व"शिक्षक मित्र" च्या वाचकांच्या वतीने "श्री हरके महेश शरणप्पा "सरांचे जाहीर आभार ………!
       

सावित्रिबाई फुले-ई शिष्यवृत्ती-मुख्याध्यापक माहीती पुस्तिका (pdf) डाउनलोड करा.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

1)  ५ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींसाठी
2)  अनुसूचित जाती/ विशेष मागास प्रवर्ग / विमुक्त भटक्या जमाती मधील विद्यार्थिनींसाठी

सावित्रीबाई फुले-ई शिष्यवृत्ती मुख्याध्यापक माहीती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

03 August 2014

WhatsApp विरूद्ध hike.....! कोण अधिक चांगला ?

 WhatsApp आणि   hike messenger दोन्ही instant messaging App आहेत. दोन्ही App जवळपास सारखेच आहेत . पण hike messenger ने WhatsApp पेक्षा अधिक सुविधा पुरविलेल्या आहेत . त्यामुळेच hike messenger  WhatsApp पेक्षा अधिक सरस ठरतो . hike messenger WhatsApp पेक्षा अधिक  चांगला असण्याचा आढावा पुढील प्रमाणे आहे.





 १) hike मधे instant messaging सेवा व SMS सेवा या दोन्ही सेवा वापरता येतात . 
२) WhatsApp मधे SMS सेवा वापरता येत नाही . 
३) hike वापरकर्त्याला दर महिण्याला १०० SMS मोफत मिळतात . WhatsApp मधे SMS मिळत  नाही .
४)  hike मधे Reguler  SMS  साठवता व पाठवता  येतात .
५)  hike मधे Text, image,video,audio व्यतिरिक्त office document  ( pdf, ms word, ms excel, ms power point etc.), apk, exe, इत्यादी  file share करता येतात . WhatsApp मधे फक्त Text, image,video,audio
file share करता येतात. 
६) hike हे Bharti softbank या कंपनीने विकसीत केले असून या कंपनीत शेकडा पन्नास भागीदारी bharti telecome या भारतीय कंपनीची आहे. ( उर्वरीत शेकडा पन्नास भागीदारी softbsnk telecome या जापानी कंपनीची आहे.)
7) hike वापरकर्याने इतरांना  hike वारण्यासाठी प्रोत्साहीत केल्यावद्द्ल talktime व extra SMS च्या स्वरूपात त्याला बक्षीस मिळतात.
८) WhatsApp मधे ग्रुप मधील सदस्य संख्या मर्यादा 50 ,  hike मधे ग्रुप मधील सदस्य संख्या मर्यादा 100.
    त्यामुळे  hike मधे WhatsApp पेक्षा दुप्पट मोठा ग्रुप बनवता येते . 

hike messenger डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा . 

31 July 2014

महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करणे झाले सोपे........!


महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय डाउनलोड करणे सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना जी. आर. डाउउनलोड करता यावे याकरीता अधिकृत साॅफ्टवेअरची निर्मीती केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


30 July 2014

शालेय रजिस्टर व फाईल ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.

            
मित्रांनो, आपल्या शाळॆत अंदाजे वेगवेगळी  150 ते 200 रजिस्टर्स व फाईल्स असतात.या सर्व रजिस्टर्स व फाईल्सवर योग्य क्रमांक व नाव लिहील्यास चटकण शोधता येतात व पहायला निटनेटकी दिसतात.
     
        रजिस्टर्स व फाईल्सची नावे दर्शविणार्या अंदाजे 150 पट्ट्या ( सोबतच्या चित्रात दाखविल्या प्रमाणे ) मी तयार कलेल्या आहेत.

पट्ट्या रजिस्टर व फाईलवर चिकटविल्यानंतर त्यावरून 2 इंची (पारदर्शक ) सेलोटेप चिकटवा , त्यामुळे लॅमिनेशन केल्याप्रमाणे होईल व लवकर खराब हेणार नाही.

रजिस्टर व फाईल्स ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.


शालेय कार्यालयीन कागदपत्रॆ /प्रपत्रॆ/तक्ते/वेळापत्रक /अर्ज / वार्षिक- मासिक नियोजन इ. डाउनलोड करा

मुख्याध्यापकासाठी किरकोळ रजेचा अर्ज  ( pdf ) डाउनलोड

शिक्षकांसाठी किरकोळ रजेचा अर्ज ( pdf ) डाउनलोड

माहितीचा अधीकार अर्ज ( pdf ) डाउनलोड

दाखल -खारीज उतारा (pdf ) डाउनलोड

बोनाफाईड सर्टीफिकेट ( pdf ) डाउनलोड

निकालपत्रक ( pdf ) डाउनलोड

मासिक प्रगतीपत्रक  ( pdf ) डाउनलोड

सूचना:
लवकरच  शिक्षकांना / शाळांना उपयोगी पडणारी ईतर 50 -75 कागदपत्रॆ / प्रपत्रॆ /तक्ते / वार्षिक-मासिक नियोजन/ अर्ज / वेळापत्रक इ. उपलब्ध करून देण्यात येतील.


29 July 2014

पूर्व माध्यमिक/माध्यमिक ( 4 थी , 7 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा - फेब्रु.2014 -ऑनलाईन निकाल


इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु.2014 चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

1)  वर्ग 4 था (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (M.S.S.) मार्च २०१४ निकाल)

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2) वर्ग 7 वा (माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (H.S.S.) मार्च २०१४ निकाल)

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



27 July 2014

ईन्स्पायर अवार्ड -शाळा नोंदनी व विद्यार्थी नाॅमीनेशन कसे कराल ?

     या शैक्षणिक सत्रापासून इन्स्पायर अवार्ड साठी इयत्ता 6 ते 10 असणार्या शाळांना व सहभागी होणार्या विद्यार्थ्यांची http://www.inspire-dst.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदनी करावयाची आहे.
        http://www.inspire-dst.gov.in या संकेतस्थळावर नोंदनी करण्यासाठी मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका (user mannual)  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

26 July 2014

चला बनवुया कागदी फुले



 

आपण 
वरील चित्रांत दाखवलेली व ईतर अनेक कागदी फुले तयार करण्यासाठी ,step by step कृती विषयी मार्गदर्शन करणारी अनेक साॅफ्टवेअर play store  वर उपलब्ध आहेत. साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

1) https://play.google.com/store/apps/details?id=com.firstchicks.easyorigamiflower

2) https://play.google.com/store/apps/details?id=com.origamiFan.origami

3) https://play.google.com/store/apps/details?id=com.howto.easyorigamiflowerbouquet

4) https://play.google.com/store/apps/details?id=com.kayeapps.origamiart

5) https://play.google.com/store/apps/details?id=com.howtomake.origamiflower

6) https://play.google.com/store/apps/details?id=com.ndimensions.origami


मित्रांनो ,तुमच्याजवळ शिक्षकांना उपयोगी पडेल अशी कोणतीही माहिती असेल, ती माहिती मला prashantkarhade8@gmail.com  या मेल पत्त्यावर  पाठवा ,अथवा  9623344643 (what's aap & hike) या मोबाईल क्रमांकावर पाठवा . आपण पाठवलेली माहिती किंवा लेख तुमच्या नावासह 'शिक्षण मित्र' 
( www.shikshanmitra.blogspot.com ) संकेतस्थळावर (ब्लॉग ) प्रसिद्ध करण्यात येईल . 


25 July 2014

ऑनलाईन मराठी विश्वकोश

         'घराघरात विश्वकोश'
    (एक ऐतिहासिक दस्तावेज)                                                      

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा  ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा)  संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.
       घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत.

              ( वरील मजकूर http://www.marathivishvakosh.in या संकेतस्थळावरून साभार )

ऑनलाईन मराठी विश्वकोश पाहण्यासाठी http://www.marathivishvakosh.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.



माहीती / लेख या ऑनलाईन मराठी विश्वकोशात शोधण्यासाठी ,वरील चित्रात  बाणाने दाखविलेल्या सर्च बार मधे जी माहीती शोधायची आहे त्यासबंधी किवर्ड देवनागरीत लिहून सर्च या बटनावर क्किक करा.मराठीत टाईप करण्यासाठी सर्च बटनाच्या जवळच्या किबोर्डच्या चित्रावर क्लिक करा आपोआप आभासी कळफलक ( vertual keyboard - खालील चित्राप्रमाणे ) सक्रिय होईल .vertual keyboard च्या मदतीने मराठीत टाईप करा.



कुमार विश्वकोश - मुलांसाठी ऑनलाईन विश्वकोश



    मुलांसाठी असलेले 'कुमार विश्वकोश 'आता ऑनलाईन उपलब्ध आहे.ऑनलाईन विश्वकोश पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 http://www.vishwakosh.org.in/kumarm   

विकीपीडिया-मुक्त ज्ञानकोश

        हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

विकिपीडियाची सुरुवात २००१ साली इंग्रजी भाषेत झाली. आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत ४० लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वांत विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.

विकिपिडीया हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्‍ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.

विकिपीडियाचा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे. मराठीचा पण यात समावेश आहे. अनेक मराठी भाषिक यास हातभार लावत आहेत.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार) सध्या यात ४०,३८१ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण एक कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

(http://mr.m.wikipedia.org  या संकेतस्थळावरून साभार)

विकिपीडीया वर हवी ती माहीती (लेख) शोधण्याची पध्दत

१) http://mr.m.wikipedia.org या संकेत स्थळावर जा.

२) खालील चित्राप्रमाणे होमपेज ओपन होईल.

३) सर्च बार मधे किवर्ड देवनागरी मधे लिहून सर्च या टॅब वर क्लिक करा.



उदा. खालील चित्रात लाल बहादूर यांच्या विषयी माहीती (लेख) शोधण्याठी सर्च बार मधे 'लाल बहादूर शास्त्री' हा कीवर्ड लिहूण सर्च केले आहे.









वरील उदाहरणाप्रणाणे विकिपीडीया वरून हवी ती माहीती मिळवा. 



24 July 2014

function keys चा ms excel मधे वापर ( shortcuts keys)

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील काही Advance Keyboard shortcuts 

संगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys असतात. या function keys चा वापर एक्सेलमध्ये  shortcut म्हणून कसा करावा ?.............

F1 HELP / मदत  चा शॉर्टकट
F2 सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click)
F3 फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे
F4 शेवटची Command वा Action पुन्हा करणे
F5 Go to Dialogue box चा शॉर्टकट
F6 स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता
F7 स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट
F8 एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता
F9 फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता
F10 मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता
F11 Column type chart बनविण्याकरीता
F12 "Save As" Dialogue box चा शॉर्टकट
       







1) CTRL+C (Copy)
2) CTRL+X (Cut) 
3) CTRL+V (Paste) 
4 CTRL+Z (Undo) 
5 Delete (Delete) 
6 Shift+Delete (Delete the selected item permanently without placing the item in the Recycle Bin) 
7 CTRL while dragging an item (Copy the selected item) 
8 CTRL+Shift while dragging an item (Create a shortcut to the selected item) 
9 F2 key (Rename the selected item) 
10 CTRL+RIGHT ARROW (Move the insertion point to the beginning of the next word) 
11 CTRL+LEFT ARROW (Move the insertion point to the beginning of the previous word) 
12 CTRL+DOWN ARROW (Move the insertion point to the beginning of the next paragraph) 
12 CTRL+UP ARROW (Move the insertion point to the beginning of the previous paragraph) 
13 CTRL+Shift with any of the arrow keys (Highlight a block of text) 
14 Shift with any of the arrow keys (Select more than one item in a window or on the desktop, or select text in a document) 
15 CTRL+A (Select all) 
16 F3 key (Search for a file or a folder) 
17 Alt+Enter (View the properties for the selected item) 
18 Alt+F4 (Close the active item, or quit the active program) 
19 Alt+Enter (Display the properties of the selected object) 
20 Alt+Spacebar (Open the shortcut menu for the active window) 
21 CTRL+F4 (Close the active document in programs that enable you to have multiple documents open simultaneously) 
22 Alt+Tab (Switch between the open items) 
23 Alt+ESC (Cycle through items in the order that they had been opened) 
24 F6 key (Cycle through the screen elements in a window or on the desktop) 
25 F4 key (Display the Address bar list in My Computer or Windows Explorer) 
26 Shift+F10 (Display the shortcut menu for the selected item) 
27 Alt+Spacebar (Display the System menu for the active window) 
28 CTRL+ESC (Display the Start menu) 
29 Alt+Underlined letter in a menu name (Display the corresponding menu) 
30 Underlined letter in a command name on an open menu (Perform the corresponding command) 
31 F10 key (Activate the menu bar in the active program) 
32 RIGHT ARROW (Open the next menu to the right, or open a submenu) 
33 LEFT ARROW (Open the next menu to the left, or close a submenu) 
34 F5 key (Update the active window) 
35 Backspace (View the folder one level up in My Computer or Windows Explorer) 
36 ESC (Cancel the current task)

डेल्टा-15 ची कहाणी ( निला सत्यनारायण यांचा सकाळ मधला लेख )

नीला सत्यनारायण यांचा सकाळ मधला लेख. 

अमेरिकेत "9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे.

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर
दुसऱ्या मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड
करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

"डेल्टा-15‘या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे
कारण काय हे कुणालाच समजले नाही.वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता.

कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले,
तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.
या सगळ्या विमानांतील
प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात
हा विमानतळ होता,त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत
या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग,
खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले. पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व
व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

"डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले.

तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय,

गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती.
प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता,
की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता.
गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण
कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने
वैमानिकाला सांगितले, की " मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही.मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती,
की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.

प्रवासी म्हणाला, ""या गावाने तीन
दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे
कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण
सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार
काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात
आहे.

मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव
"डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.‘‘
बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम
मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते

. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक
होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली.

विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते.
त्यांना काही इजा झाली असती, तर
कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव
निधी घातला.

""डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला,
तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले,
असे त्यांना वाटले व ते समाधान पावले.

कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले.ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध
झाली.

अशी ही "डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काहीआणीबाणी
चा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते,त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो,
त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे
कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो.आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे,
असे वारंवार सिद्ध होते.

"डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित
आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे. 

21 July 2014

झाडांच्या पानांपासून तयार करा प्राणी-पक्ष्यांचे आकार


मित्रांनो ,खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे झाडांच्या पानांपासून प्राणी-पक्ष्यांचे आकार विद्यार्थी आवडीने तयार करतील, फक्त ही चीत्रे त्यांना दाखवा.