31 July 2014

महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करणे झाले सोपे........!


महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय डाउनलोड करणे सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना जी. आर. डाउउनलोड करता यावे याकरीता अधिकृत साॅफ्टवेअरची निर्मीती केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


30 July 2014

शालेय रजिस्टर व फाईल ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.

            
मित्रांनो, आपल्या शाळॆत अंदाजे वेगवेगळी  150 ते 200 रजिस्टर्स व फाईल्स असतात.या सर्व रजिस्टर्स व फाईल्सवर योग्य क्रमांक व नाव लिहील्यास चटकण शोधता येतात व पहायला निटनेटकी दिसतात.
     
        रजिस्टर्स व फाईल्सची नावे दर्शविणार्या अंदाजे 150 पट्ट्या ( सोबतच्या चित्रात दाखविल्या प्रमाणे ) मी तयार कलेल्या आहेत.

पट्ट्या रजिस्टर व फाईलवर चिकटविल्यानंतर त्यावरून 2 इंची (पारदर्शक ) सेलोटेप चिकटवा , त्यामुळे लॅमिनेशन केल्याप्रमाणे होईल व लवकर खराब हेणार नाही.

रजिस्टर व फाईल्स ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.


शालेय कार्यालयीन कागदपत्रॆ /प्रपत्रॆ/तक्ते/वेळापत्रक /अर्ज / वार्षिक- मासिक नियोजन इ. डाउनलोड करा

मुख्याध्यापकासाठी किरकोळ रजेचा अर्ज  ( pdf ) डाउनलोड

शिक्षकांसाठी किरकोळ रजेचा अर्ज ( pdf ) डाउनलोड

माहितीचा अधीकार अर्ज ( pdf ) डाउनलोड

दाखल -खारीज उतारा (pdf ) डाउनलोड

बोनाफाईड सर्टीफिकेट ( pdf ) डाउनलोड

निकालपत्रक ( pdf ) डाउनलोड

मासिक प्रगतीपत्रक  ( pdf ) डाउनलोड

सूचना:
लवकरच  शिक्षकांना / शाळांना उपयोगी पडणारी ईतर 50 -75 कागदपत्रॆ / प्रपत्रॆ /तक्ते / वार्षिक-मासिक नियोजन/ अर्ज / वेळापत्रक इ. उपलब्ध करून देण्यात येतील.


29 July 2014

पूर्व माध्यमिक/माध्यमिक ( 4 थी , 7 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा - फेब्रु.2014 -ऑनलाईन निकाल


इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु.2014 चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

1)  वर्ग 4 था (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (M.S.S.) मार्च २०१४ निकाल)

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2) वर्ग 7 वा (माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (H.S.S.) मार्च २०१४ निकाल)

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



27 July 2014

ईन्स्पायर अवार्ड -शाळा नोंदनी व विद्यार्थी नाॅमीनेशन कसे कराल ?

     या शैक्षणिक सत्रापासून इन्स्पायर अवार्ड साठी इयत्ता 6 ते 10 असणार्या शाळांना व सहभागी होणार्या विद्यार्थ्यांची http://www.inspire-dst.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदनी करावयाची आहे.
        http://www.inspire-dst.gov.in या संकेतस्थळावर नोंदनी करण्यासाठी मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका (user mannual)  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

26 July 2014

चला बनवुया कागदी फुले



 

आपण 
वरील चित्रांत दाखवलेली व ईतर अनेक कागदी फुले तयार करण्यासाठी ,step by step कृती विषयी मार्गदर्शन करणारी अनेक साॅफ्टवेअर play store  वर उपलब्ध आहेत. साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

1) https://play.google.com/store/apps/details?id=com.firstchicks.easyorigamiflower

2) https://play.google.com/store/apps/details?id=com.origamiFan.origami

3) https://play.google.com/store/apps/details?id=com.howto.easyorigamiflowerbouquet

4) https://play.google.com/store/apps/details?id=com.kayeapps.origamiart

5) https://play.google.com/store/apps/details?id=com.howtomake.origamiflower

6) https://play.google.com/store/apps/details?id=com.ndimensions.origami


मित्रांनो ,तुमच्याजवळ शिक्षकांना उपयोगी पडेल अशी कोणतीही माहिती असेल, ती माहिती मला prashantkarhade8@gmail.com  या मेल पत्त्यावर  पाठवा ,अथवा  9623344643 (what's aap & hike) या मोबाईल क्रमांकावर पाठवा . आपण पाठवलेली माहिती किंवा लेख तुमच्या नावासह 'शिक्षण मित्र' 
( www.shikshanmitra.blogspot.com ) संकेतस्थळावर (ब्लॉग ) प्रसिद्ध करण्यात येईल . 


25 July 2014

ऑनलाईन मराठी विश्वकोश

         'घराघरात विश्वकोश'
    (एक ऐतिहासिक दस्तावेज)                                                      

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा  ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा)  संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.
       घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत.

              ( वरील मजकूर http://www.marathivishvakosh.in या संकेतस्थळावरून साभार )

ऑनलाईन मराठी विश्वकोश पाहण्यासाठी http://www.marathivishvakosh.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.



माहीती / लेख या ऑनलाईन मराठी विश्वकोशात शोधण्यासाठी ,वरील चित्रात  बाणाने दाखविलेल्या सर्च बार मधे जी माहीती शोधायची आहे त्यासबंधी किवर्ड देवनागरीत लिहून सर्च या बटनावर क्किक करा.मराठीत टाईप करण्यासाठी सर्च बटनाच्या जवळच्या किबोर्डच्या चित्रावर क्लिक करा आपोआप आभासी कळफलक ( vertual keyboard - खालील चित्राप्रमाणे ) सक्रिय होईल .vertual keyboard च्या मदतीने मराठीत टाईप करा.



कुमार विश्वकोश - मुलांसाठी ऑनलाईन विश्वकोश



    मुलांसाठी असलेले 'कुमार विश्वकोश 'आता ऑनलाईन उपलब्ध आहे.ऑनलाईन विश्वकोश पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 http://www.vishwakosh.org.in/kumarm   

विकीपीडिया-मुक्त ज्ञानकोश

        हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

विकिपीडियाची सुरुवात २००१ साली इंग्रजी भाषेत झाली. आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत ४० लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वांत विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.

विकिपिडीया हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्‍ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.

विकिपीडियाचा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे. मराठीचा पण यात समावेश आहे. अनेक मराठी भाषिक यास हातभार लावत आहेत.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार) सध्या यात ४०,३८१ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण एक कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

(http://mr.m.wikipedia.org  या संकेतस्थळावरून साभार)

विकिपीडीया वर हवी ती माहीती (लेख) शोधण्याची पध्दत

१) http://mr.m.wikipedia.org या संकेत स्थळावर जा.

२) खालील चित्राप्रमाणे होमपेज ओपन होईल.

३) सर्च बार मधे किवर्ड देवनागरी मधे लिहून सर्च या टॅब वर क्लिक करा.



उदा. खालील चित्रात लाल बहादूर यांच्या विषयी माहीती (लेख) शोधण्याठी सर्च बार मधे 'लाल बहादूर शास्त्री' हा कीवर्ड लिहूण सर्च केले आहे.









वरील उदाहरणाप्रणाणे विकिपीडीया वरून हवी ती माहीती मिळवा. 



24 July 2014

function keys चा ms excel मधे वापर ( shortcuts keys)

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील काही Advance Keyboard shortcuts 

संगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys असतात. या function keys चा वापर एक्सेलमध्ये  shortcut म्हणून कसा करावा ?.............

F1 HELP / मदत  चा शॉर्टकट
F2 सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click)
F3 फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे
F4 शेवटची Command वा Action पुन्हा करणे
F5 Go to Dialogue box चा शॉर्टकट
F6 स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता
F7 स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट
F8 एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता
F9 फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता
F10 मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता
F11 Column type chart बनविण्याकरीता
F12 "Save As" Dialogue box चा शॉर्टकट
       







1) CTRL+C (Copy)
2) CTRL+X (Cut) 
3) CTRL+V (Paste) 
4 CTRL+Z (Undo) 
5 Delete (Delete) 
6 Shift+Delete (Delete the selected item permanently without placing the item in the Recycle Bin) 
7 CTRL while dragging an item (Copy the selected item) 
8 CTRL+Shift while dragging an item (Create a shortcut to the selected item) 
9 F2 key (Rename the selected item) 
10 CTRL+RIGHT ARROW (Move the insertion point to the beginning of the next word) 
11 CTRL+LEFT ARROW (Move the insertion point to the beginning of the previous word) 
12 CTRL+DOWN ARROW (Move the insertion point to the beginning of the next paragraph) 
12 CTRL+UP ARROW (Move the insertion point to the beginning of the previous paragraph) 
13 CTRL+Shift with any of the arrow keys (Highlight a block of text) 
14 Shift with any of the arrow keys (Select more than one item in a window or on the desktop, or select text in a document) 
15 CTRL+A (Select all) 
16 F3 key (Search for a file or a folder) 
17 Alt+Enter (View the properties for the selected item) 
18 Alt+F4 (Close the active item, or quit the active program) 
19 Alt+Enter (Display the properties of the selected object) 
20 Alt+Spacebar (Open the shortcut menu for the active window) 
21 CTRL+F4 (Close the active document in programs that enable you to have multiple documents open simultaneously) 
22 Alt+Tab (Switch between the open items) 
23 Alt+ESC (Cycle through items in the order that they had been opened) 
24 F6 key (Cycle through the screen elements in a window or on the desktop) 
25 F4 key (Display the Address bar list in My Computer or Windows Explorer) 
26 Shift+F10 (Display the shortcut menu for the selected item) 
27 Alt+Spacebar (Display the System menu for the active window) 
28 CTRL+ESC (Display the Start menu) 
29 Alt+Underlined letter in a menu name (Display the corresponding menu) 
30 Underlined letter in a command name on an open menu (Perform the corresponding command) 
31 F10 key (Activate the menu bar in the active program) 
32 RIGHT ARROW (Open the next menu to the right, or open a submenu) 
33 LEFT ARROW (Open the next menu to the left, or close a submenu) 
34 F5 key (Update the active window) 
35 Backspace (View the folder one level up in My Computer or Windows Explorer) 
36 ESC (Cancel the current task)

डेल्टा-15 ची कहाणी ( निला सत्यनारायण यांचा सकाळ मधला लेख )

नीला सत्यनारायण यांचा सकाळ मधला लेख. 

अमेरिकेत "9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे.

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर
दुसऱ्या मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड
करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

"डेल्टा-15‘या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे
कारण काय हे कुणालाच समजले नाही.वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता.

कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले,
तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.
या सगळ्या विमानांतील
प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात
हा विमानतळ होता,त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत
या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग,
खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले. पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व
व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

"डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले.

तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय,

गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती.
प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता,
की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता.
गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण
कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने
वैमानिकाला सांगितले, की " मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही.मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती,
की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.

प्रवासी म्हणाला, ""या गावाने तीन
दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे
कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण
सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार
काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात
आहे.

मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव
"डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.‘‘
बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम
मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते

. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक
होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली.

विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते.
त्यांना काही इजा झाली असती, तर
कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव
निधी घातला.

""डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला,
तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले,
असे त्यांना वाटले व ते समाधान पावले.

कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले.ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध
झाली.

अशी ही "डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काहीआणीबाणी
चा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते,त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो,
त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे
कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो.आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे,
असे वारंवार सिद्ध होते.

"डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित
आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे. 

21 July 2014

झाडांच्या पानांपासून तयार करा प्राणी-पक्ष्यांचे आकार


मित्रांनो ,खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे झाडांच्या पानांपासून प्राणी-पक्ष्यांचे आकार विद्यार्थी आवडीने तयार करतील, फक्त ही चीत्रे त्यांना दाखवा.

माझी शाळा - सह्याद्री TV वरील कार्यक्रम(मालीका)











 माझी शाळा

बंदिशाळा नव्हे, संधी देते ती शाळा !!!

MKCL निर्मित, लेखक : सुमित्रा भावे
दिग्दर्शक : सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल अशी दूरदर्शन मालिका
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर
२० ऑक्टोबर पासून सुरु
रविवारी सकाळी ९.३० ते १०.००
पुन:प्रक्षेपण: शनिवारी रात्री ९.०० ते ९.३०
अवश्य पहा.

झालेले भाग (episode) you tube  वर पाहण्यासाठी येथे http://m.youtube.com/watch?v=qDc1Sb4Lk-4  क्लिक  करा.

20 July 2014

शिक्षकांना उपयुक्त काही साॅफ्टवेअर ( must have-software)

       
 जर आपण स्मार्टफोन वापरत असाल , तर  तुमच्या फोनमध्ये खालील साॅफ्टवेअर डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनला अधिक " स्मार्ट" बनवा.


1) Maharastra gov. GR download 
महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी असलेले अधिकृत  साॅफ्टवेअर. 
साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा

2) kingsoft office

किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अफ्लीकेशन आहे. या
साॅफ्टवेअरमधे MS OFFICE मधे ओपन होणारे MS WORD, MS EXCEL,
PPT  तसेच PDF फाईल ओपन करता येतात ,तसेच संपादन (edit) सुद्धा करता येते.
डाउनलोड

3) tubemate
ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.
 tubemate डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

4) yoga sadhana
या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध माहीती सचीत्र दिलेली आहे.डाउनलोड

5) baalwadi 
बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साह्याने मराठी व इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक  अत्यंत मनोरंजक पद्धतीने शिकता- शिकवता येतात.
डाउनलोड

6) Any video converter
mp4, mpeg4 , 3gp, avi इ. विडीओ चे वेगवेगळ्या  mp3 मधे व इतर   format मधे रूपांतर करता येते.
डाउनलोड

7 ) NewsHunt
इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय तसेच अनेक भाषेतील ईबूक डाऊनलोड करण्याची सुविधा आहे  डाउनलोड

SpackMan
या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे बॅकअप घेता येते.

Marathi Mhani
शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.
डाउनलोड

Scan To PDF
याच्या साह्याने कागदपत्रॆ  scan  करता येतात. स्कॅन केलेली फाईल PDF फाॅरमॅट मधे तयार होते.यानंतर DOCUMENT ची फोटो न काढता scan करा.डाउनलोड

My Tax India
इंकम टॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन करणारे साॅफ्टवेअर.डाउनलोड

Dropbox
आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, विडीओ व इतर फाईल्स store करण्याची सुविधा. यात store  केलेल्या फाईल ची लिंक  share करता येते.डाउनलोड

Learn Marathi For Kids v1
मराठी मुळाक्षरे व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी उपयोगी.
डाउनलोड

hike
hike massenger हे भारतीय
साॅफ्टवेअर आहे. यात what's aap पेक्षा अधिक सुविधा आहेत. what's aap मधे video,audio,image  व्यतीरिक्त ईतर फाईल शेअर करता येत नाही , पण hike मधे  ms word / excel / power point / pdf  100mb पर्यतच्या फाईल शेअर करता येतात.डाउनलोड

state bank freedom
मोबाईल वर बँकिंग व्यवहार करण्यासाठी. हा साॅफ्टवेअर play store वरून डाउनलोड करा.

Origami, Origami Flower, Origami Art
कागदापासू वेगवेगळे प्राणी,पक्षी,फुले इ. तयार करण्याविषयी सचित्र मार्गदर्शन.

Genral Knowledge, English Grammar,हिंदी व्याकरण  , stat bank freedom ,etc.



18 July 2014

खो-खो खेळाचे कौशल्य,मैदान व नियम

खो-खो खेळाचे कौशल्य,मैदान व नियमांची माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

17 July 2014

खेळ विज्ञानाचे-कृती आणि कौशल्य

         ' खेळ विज्ञानाचे-कृती आणि कौशल्य' हे अरविंद गुप्ता यांचे भन्नाट पुस्तक आहे.या  पुस्तकात विज्ञान खेळणी / शैक्षणिक साहीत्य तयार करण्याचची कृती सचित्र दिलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे आपण अनेक गमतीदार व मनोरंजक खेळणी /शैक्षणिक साहित्य बनवू शकतो.
      विद्यार्थीसुद्धा पुस्तक पाहून साहीत्य तयार करू शकतात त्यामुळे साहीत्य बनवता-बनवता त्यामागील वैज्ञानिक तत्व आपोआप शिकतात, हा माझा अनुभव आहे.

अरविंद गुप्ता यांचे खेळ विज्ञानाचे व इतर पस्तके (ebook) डाऊनलोड करण्यासाठी या http://arvindguptatoys.com/   साईटला भेट द्या. 


या पुस्तकातील काही पृष्ठ..........
   

14 July 2014

युट्यूब विडीयो डाउनलोड करा .




         यूट्यूब, ही गूगलने इंटरनेटवर विडीयो पाहण्यासाठी व दाखवण्यासाठी जनतेला दिलेली सुविधा आहे. युट्युबवर वेगवेगळ्या प्रकारची लाखो विडीयो आपण आँनलाईन पाहू शकतो पण डाऊनलोड मात्र करू शकत नाही.

you tube डाउनलोड करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करा.

जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर ( android os  असलेला)

  


 tubemate हा साॅफ्टवेअर डाऊनलोड करा.

tubemate डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जर आपण संगणकावर इंटरनेट वापरत असाल तर

कोणताही एक युट्युब डाऊनलोडर साॅफ्टवेअर डाऊनलोड करा
उदा. Free youtube downloader

www.youtube.com या संकेतस्थळावर जा.   
जो विडीयो डाऊनलोड करावयाचा आहे, त्याची 'Link' copy करा.( लिंक काॅपी करण्यासाठी youtube साईटवर विडीयोच्या बाजुला / खाली जे विडीयोचे नाव असते त्यावर right click  करा. जी विंडो ओपन होईल त्यात सर्वात खाली propertise वर क्लिक करा. तुम्हाला URL / ADDRESS ( link ) दिसेल सिलेक्ट करून right click करा व काॅपी करा.)

 काॅपी केलेली लींक youtub downloader  ओपन करून त्यात URL चौकटीत पेस्ट करा. व डाऊनलोड बटनावर क्लीक करा.

जर आपण स्मार्टफोन वापरत नाही तर

जर आपन जुनाच java किंवा symbian os असलेला फोन वापरता, तर tubidy.mobi या साईटवरुन विडीओ डाऊनलोड करू शकता. tubidy.mobi ही मोबाईल विडीओ साईट असून youtub वरील सर्व नाही पण बहुतेक विडीओ डाऊनलोड करू शकता.

tubidy.mobi या साईटला भेट देण्यासाठी यथे क्लिक करा

10 July 2014

खेळण्यांचा जादुगर-अरविंद गुप्ता


 

 शिक्षण क्षॆत्रातील अफलातून व्यक्तिमत्व , ज्यांना 'खेळण्यांचा जादुगर' या नावाने ओळखल्या जाते. कानपूर आय.आय. टी. पदविधर असलेल्या या अभियंत्याचे मन जास्त शिक्षण क्षॆत्रातच रमले. काही वर्षे टेल्कोमध्ये काम केल्यानंर 1978 साली सुट्टी घेऊन मध्यप्रदेशातील होशंगाबाद या आदिवासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळात जाऊन तळागाळात विज्ञान शिकवण्याचे काम कसे चालते याचा अभ्यिस केला. याच काळात त्यांनी परिसरात सहज उपलब्ध असणार-या साहित्यापासून  शैक्षिणक साहित्य तयार केले.
 
    अरविंद गुप्तांनी मुलांना विज्ञानातील संबोध-संकल्पना सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजण्यासाठी शेकडो विज्ञान खेळण्यांची व शैक्षणिक साहित्याची णिर्मीती केली. त्यांच्या या योगदानिची दखल अनेक आंतराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. जसे युनीसेफ, युनेस्को, इंटरनँशनल टाँय रिसर्च असोसिएशन इ.
गुप्तांची विज्ञान खेळणी, शैक्षणिक साहित्य  तयार करण्याचे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://arvindguptatoys.com

अरविंद गुप्ता यांच्या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.