03 September 2015

ABP माझा कडून 'शिक्षणमित्र'चा सन्मान


'ABP माझा' ही  वृत्त वाहिनी दरवर्षी आयोजित आयोजित करत असते. या वर्षीच्या  या स्पर्धेमध्ये  माझ्या ‘शिक्षणमित्र’ www.shikshanmitra.in या शैक्षणिक ब्लॉग ( वेबसाईट ) ची निवड करण्यात आली.
 मराठी ब्लॉगर्स साठी एकमेव असलेली अभिनव अशी स्पर्धा “ब्लॉग माझा” 

शेती, साहित्य, नागरी समस्या, शिक्षण, पर्यावरण ई. विषयांना वाहिलेले मराठी ब्लॉग हे एकप्रकारे इंटरनेटवर मराठी भाषेच्या आश्वासक वाटचालीचे निदर्शक आहेत. या ब्लॉगना दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’ ही स्पर्धा. महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद लाभला.

           ब्लॉग माझा स्पर्धेचं पुरस्कार वितरण यावर्षी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात 31 ऑगस्ट 2015 रोजी आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ, मुंबई येथे राज्याचे शिक्षण मंत्री - मा. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, व उद्योग जगतातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एबीपी माझा वरून करण्यात आले
.
'शिक्षणमित्र' वर प्रेम असणाऱ्यां आपणा सर्वांचे तसेच 'ABP माझा' चे मनापासून आभार . यानंतरही  असेच सहकार्य करत रहाल अशी आशा बाळगतो.

18 July 2015

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर 2.1 ( MDM Calculator 2.1)

                                             
वैशिष्टे 
1) आता अगदी नव्या रूपात..
2) totally customisable.. एका बटनावर सर्व जवळ जवळ ५०+ घटक बदलून सेव करता येतात.
3) प्रमाण | पूरक आहार नियोजन | पाककृती या तिन्ही बाबी बदलण्याची व सेव करण्याची सुविधा.
4) हे App बंद केल्यानंतर पुन्हा सुरु केल्यावर आपण केलेले बदल अपोआप लोड होतात.
5) गणक यंत्रातील पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय.
6) होम स्क्रीन वर तुमचे/शाळेचे नाव लिहू शकता. ते सेव करू शकता.
7) वापरण्यास पहिल्यापेक्षा सुलभ / युजर फ्रेंडली.                      
8) कसे वापरावे याची पूर्ण माहिती.
संजय गोरे, प्राथमिक शिक्षक  ( ता. खटाव, जि. सातारा ),यांनी विकसित केलेले Android App. 
यांच्या ब्लॉग ला अवश्य भेट
( केंद्र समूह वर्धनगड )

09 July 2015

शालेय परिपाठ - Android App

दैनदिन शालेय परिपाठासाठी लागणारे उपयुक्त असे app 
जरूर डाऊनलोड करा.
सदर App  Google Play Store वर डाऊनलोड करण्यासाठी  उपलब्ध आहे.

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



17 March 2015

मराठी भाषेतून सरकारचे नवे वेबपोर्टल

(  मला आलेले  इमेल आपल्या माहितीसाठी कोणताही बदल न  करता देत आहे )
मा.प्रशांत क-हाडे,
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द ) प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर 
सस्नेह नमस्कार .
   आपण शिक्षण क्षेत्रात समाज विकासाच्या प्रक्रियेत कटिबद्ध आहात. त्याबद्दल धन्यवाद. आपला भारत देश हा कृषिप्रधान आणि खेड्यांचा देश आहे, हे आपण  जाणताच आणि म्हणूनच आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे गरजेचे आहे.
   २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. याचा वापर करून जगातील अनेक देशांनी विकासाची गती पकडलेली आहे. आपल्या देशातही यामुळे अनेक अमुलाग्र बदल लोकांच्या जीवनात घडून येताना दिसताहेत. परंतु या माहिती तंत्रज्ञानाचे फायदे फक्त शहरी लोकांनाच जास्त होत आहे. त्या तुलनेत ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक इ. या लाभांपासून वंचित आहेत. याची मुख्य दोन कारणे म्हणजे

13 March 2015

सातत्यपूर्ण संर्वकंष मूल्यमापन


संकलित मूल्यमापन
वर्ग 5 वा  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( निर्मिती : नाकाडे अशोक तुकाराम, जि.प.प्रा. शा. डहाळेगाव ता. घनसावंगी जि.जालना )
आकारिक मूल्यमापन
1) वर्णनात्मक नोंदी -  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( MS EXCEL FILE, निर्मिती :   श्री.महेश हरके )
2 ) आकारिक मूल्यमापन 
 द्वितीय सत्र- तंत्र चाचणी चे नमुना  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. 
 (निर्मिती : प्रफुल रायभान बनसोड, स.शि.,जि.प.प्राथ.शाळा करजगाव.ता.तिवसा,जि.अमरावती मो.न.  ९५७९००१९५४)


07 March 2015

नारळाच्या करवंट्या पासून कलाकृती

            नारळ हा निसर्गातील कल्पवृक्ष आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण नारळातील खोबरे वापरतो व करवंटी फेकून देतो. मात्र या नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू तयार करता येतात, हे रत्नागिरीतल्या पाचारळ ( ता. मंडणगड ) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी सिद्ध केले आहे. टाकाऊ करवंटी पासून  स्मुतीचीन्ह, चषक, मेणबत्ती स्टॅँ , मोबईल स्टॅँड, इत्यादी पन्नासहून अधिक शोभिवंत वस्तूची निर्मिती सुनील मोरे यांनी केली आहे. ही कला इतरानाही यावी यासाठी सुनील मोरे प्रयत्नशील आहेत. 



* सुनील मोरे यांच्या कलाकृती विषयी अधिक माहितीसाठी 'येथे क्लिक करा.
* माझी हस्तकला" https://m.facebook.com/misunilmore  या फेसबुक पेज ला भेट द्या
*  संपर्क :Mo. No.  960 4646 100       Email : sunilmore751@gmail.com

08 February 2015

Active Teachers Forum (ATF)

       Active Teachers Forum (ATF) हे 'राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ' सुरु होऊन तिनेक वर्षे झालीत. शिक्षकांच्या समृद्धीसाठी फोरम कार्यरतय. व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा अशा उपक्रमांसोबतच शाळेत काम करतानाचे भलेबुरे अनुभव असे अनेक गोष्टीचे शेअरिंग उत्तम पद्धतीने सुरू आहे. शाळा शाळातील मुलांचे शिकणे अधिक रंजक आणि अर्थपूर्ण होतेय, ही ATF ची सर्वात मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
          राज्यातील 26 जिल्ह्यातील 900 हून अधिक प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील, अभ्यासक- कार्यकर्ते, उत्तम अधिकारी, काही संस्थाचे प्रतिनिधी अशा लोकांनी ATF राज्याच्या कानाकोप-यात पोचवलेय. I am because we are! हे फोरमचे ब्रीद वाक्य आहे...
                                 -भाऊसाहेब चासकर
ATF च्या फेसबुक पेज ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.