17 March 2015

मराठी भाषेतून सरकारचे नवे वेबपोर्टल

(  मला आलेले  इमेल आपल्या माहितीसाठी कोणताही बदल न  करता देत आहे )
मा.प्रशांत क-हाडे,
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द ) प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर 
सस्नेह नमस्कार .
   आपण शिक्षण क्षेत्रात समाज विकासाच्या प्रक्रियेत कटिबद्ध आहात. त्याबद्दल धन्यवाद. आपला भारत देश हा कृषिप्रधान आणि खेड्यांचा देश आहे, हे आपण  जाणताच आणि म्हणूनच आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे गरजेचे आहे.
   २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. याचा वापर करून जगातील अनेक देशांनी विकासाची गती पकडलेली आहे. आपल्या देशातही यामुळे अनेक अमुलाग्र बदल लोकांच्या जीवनात घडून येताना दिसताहेत. परंतु या माहिती तंत्रज्ञानाचे फायदे फक्त शहरी लोकांनाच जास्त होत आहे. त्या तुलनेत ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक इ. या लाभांपासून वंचित आहेत. याची मुख्य दोन कारणे म्हणजे

13 March 2015

सातत्यपूर्ण संर्वकंष मूल्यमापन


संकलित मूल्यमापन
वर्ग 5 वा  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( निर्मिती : नाकाडे अशोक तुकाराम, जि.प.प्रा. शा. डहाळेगाव ता. घनसावंगी जि.जालना )
आकारिक मूल्यमापन
1) वर्णनात्मक नोंदी -  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( MS EXCEL FILE, निर्मिती :   श्री.महेश हरके )
2 ) आकारिक मूल्यमापन 
 द्वितीय सत्र- तंत्र चाचणी चे नमुना  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. 
 (निर्मिती : प्रफुल रायभान बनसोड, स.शि.,जि.प.प्राथ.शाळा करजगाव.ता.तिवसा,जि.अमरावती मो.न.  ९५७९००१९५४)


07 March 2015

नारळाच्या करवंट्या पासून कलाकृती

            नारळ हा निसर्गातील कल्पवृक्ष आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण नारळातील खोबरे वापरतो व करवंटी फेकून देतो. मात्र या नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू तयार करता येतात, हे रत्नागिरीतल्या पाचारळ ( ता. मंडणगड ) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी सिद्ध केले आहे. टाकाऊ करवंटी पासून  स्मुतीचीन्ह, चषक, मेणबत्ती स्टॅँ , मोबईल स्टॅँड, इत्यादी पन्नासहून अधिक शोभिवंत वस्तूची निर्मिती सुनील मोरे यांनी केली आहे. ही कला इतरानाही यावी यासाठी सुनील मोरे प्रयत्नशील आहेत. 



* सुनील मोरे यांच्या कलाकृती विषयी अधिक माहितीसाठी 'येथे क्लिक करा.
* माझी हस्तकला" https://m.facebook.com/misunilmore  या फेसबुक पेज ला भेट द्या
*  संपर्क :Mo. No.  960 4646 100       Email : sunilmore751@gmail.com